शुक्रवार, १३ मार्च, २०२०

कविता

    नदीची लोकांना विनंती   
मित्रांनो आता तरी सुधरा
एक आईच्या कळकळीची विनंती
               कृपा करून स्वीकरा
तुमचा एवढा भार
                         नाही होत सहन
 शांत बसून संथगतीने किती दिवस
                                करू वहन
              खूप बोलले आज म्हणून
                     रूसू नका माझ्यावर
      मला माहित आहे तुम्ही लेकरांच
         खूप प्रेम आहे तुमच्या आईवर. 

कविता : दहावीचा टप्पा

दहावीचा टप्पा, स्वप्नांची सुरुवात,
मेहनतीच्या ओघात उमलते नवी वाट.

परीक्षा ही नाही भीतीची सावली,
हीच तर यशाची पहिली पायरी.

दररोज थोडं, सातत्याने काम,
जिद्द, आत्मविश्वास देतील उत्तम नाम.

खेळा, हसा, पण ठेवा ध्यास,
शिक्षणानेच होईल उज्ज्वल प्रवास.

चुकांवरून शिका, नका होऊ खचले,
तुमच्या स्वप्नांन पंख आज लागले.

दहावी ही शेवट नाही, नवी उमेद आहे,
प्रत्येकाच्या मनात यशाची ज्योत आहे.
                    
                         सौ दिपाली फल्ले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सूत्रसंचालन

  आभार प्रदर्शनाचे स्वरूप   "ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी शिक्षण प्रसारिया ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ज्ञानाची गंगोत्री ब...