आभार प्रदर्शनाचे स्वरूप
"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी शिक्षण प्रसारिया ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ज्ञानाची गंगोत्री बहुजनांच्या दारापर्यंत घेऊन जाणारे परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे तसेच त्यांना साथ देणाऱ्या संस्थामाता सुशीला देवी साळुंखे भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व श्री स्वामी विवेकानंद या महामानवांना मी प्रथम अभिवादन करते.
आज डिजिटल टीचिंग टूल्स या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सांगता कार्यक्रमाचे आभार मानण्याचे गोड काम माझ्याकडे सोपवण्यात आले आहे.
आजचे प्रमुख पाहुणेच माननीय श्री सचिन धुमाळ साहेब जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी , सातारा आज ते कार्यक्रमास उपस्थित नसले तरी त्यांचे नेहमीच बहुमोल मार्गदर्शन असते त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.
भवानी हायस्कूलचे प्राचार्य श्री पाटील एस. बी. सर या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांच्या मी आभार मानते.
प्राचार्य डॉक्टर आर. व्ही. शेजवळ सर यांनी आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले त्याबद्दल त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानते.
आज प्राचार्य डॉक्टर आर. व्ही शेजवळ सरांचा वाढदिवस त्याबद्दल त्यांना सर्वांच्या वतीने अभिष्टचिंतन करते.
कोणत्याही कार्यक्रमात यश मिळवण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असते.कार्यक्रमाचेही तसेच आहे कार्यक्रमाचे ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन आवश्यक असते म्हणून बाळकृष्ण सुर्वे हे वेळोवेळी मार्गदर्शनासाठी नेहमीच तत्पर असतात ते नवीन गोष्टी स्वतः शिकून त्या ज्ञानाचा फायदा इतरांनाही देण्याचा त्यांच्या या स्वभावामुळे आम्हा सर्व सहकाऱ्यांना नवनवीन गोष्टींचे मार्गदर्शन मिळत असते हा ट्रेनिंग प्रोग्राम हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी केलेल्या या मार्गदर्शनामुळे आपले सर्व सहकारी तसेच महाविद्यालयातून आलेले प्रशिक्षणार्थी यांना भविष्यात याचा खूप फायदा होणार आहे, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मी मानते.
या कार्यक्रमाच्या आयोजनात ज्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असे या कार्यक्रमाचे समन्वयक यांनी देशमुख महाविद्यालयाचे प्राध्यापक कुलकर्णी सरांचे मी विशेष आभार मानते.
तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उच्च माध्यमिक व्होकेशनल विभाग कडील श्री.चव्हाण सर यांचेही मी आभार मानते.
प्रशिक्षणासाठी आलेले सर्व शिक्षक वृंद यांचेही मी आभार मानते.
कदम मॅडम, कवारे मॅडम ,साळुंखे सर नजिर नदाफ यांनी लॅब सेटिंग केली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते.
सुंदर सूत्रसंचालन करणाऱ्या कदम मॅडम यांचेही आभार मानते.
तसेच या प्रशिक्षणासाठी हेल्पिंग हॅंन्ड म्हणून बायफोकल कंप्युटर सायन्स विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचे आभार मानते.
तसेच महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय सेवक यांनी केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानते.
आणि कार्यक्रमाच्या आयोजकांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा