ब्लॉग लेखन

ब्लॉग (अनुदिनी )का लिहायचा?
         माणसाच्या मनात अनेक विचार कल्पना आणि भावना यांची सतत घुसळण होतअसते त्या कधी मुहूर्त तर कधी अमूर्त स्वरूपात व्यक्त होतात. कधी चित्रातून, कधी छायाचित्रातून, कधी शब्दातून तर कधी शब्द-चित्र-संगीत यांच्या  एकजूटतूनही
प्रकट होताना दिसतात. मनात येणारे नवे मुक्तपणे चिंतनात्मक विचार मांडायचे असतील तर 'अनुदिनी' लिहायला हवी.
'ब्लॉक का लिहायचा 'तर -
* मनातील विचार कल्पना भावना इ. व्यक्त करण्यासाठी .
* अनुभव सार्वत्रिक करण्यासाठी .
* एकाच वेळी अनेकांशी शब्दरूप संवाद साधण्यासाठी.
* स्थानिक ते जागतिक ही अवकाश पोकळी उपयोगात आणून संपर्क क्षेत्र विस्तारण्यासाठी.
* लेखन विचार आणि संशोधन यांची सांगड घालण्याची सवय होण्यासाठी.
* लेखन कौशल्याला इतर अनेक कलांची जोड देऊन कला-कलांमधील आंतरसंबंध दर्शवण्यासाठी .
* 'स्व' तील सर्जनशीलता प्रवाहित ठेवण्यासाठी.
* शब्दसंपत्ती व भाषिक कौशल्य यांच्यात वाढ आणि सुधारणा करण्यासाठी .
* आंतरजालावरील तंत्रज्ञानाचा वापर ब्लॉग लेखनासाठी करून घेण्याचा सराव होण्यासाठी .

*ब्लॉग कसा तयार करावा?

    सर्वप्रथम Blog तयार करताना आपले स्वतःचे Google मध्ये Gmail अकाऊंटअसणे आवश्यक आहे.
* Internet Explorer मध्ये www.blogger.com संकेतस्थळ उघडा.
* आपला Gmail:googleअकाऊंट पासवर्डने  log in करा.
*नवीन पेजवर title(शीर्षक)द्यावे व आपला blogger address तयार करावा .
उदा: shubham1022.blogspot.com
योग्य ती थीम(theme) निवडा.
शेवटी 'CREAT BLOG'वर क्लिक करा.
अशा प्रकारे अनुदिनी (ब्लॉग) तयार होईल.   


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सूत्रसंचालन

  आभार प्रदर्शनाचे स्वरूप   "ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी शिक्षण प्रसारिया ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ज्ञानाची गंगोत्री ब...