रेसिपी

चकली भाजणी
वाढणी : साधारण एक किलो

साहित्य:
दिड कप चणाडाळ
१/२ कप उडीदडाळ
१/२ कप मूगडाळ
२ कप तांदूळ
१/४ कप साबुदाणा
५० ग्राम जिरे (साधारण १/४ कप)
मूठभर धणे

कृती:
१) सर्व डाळी वेगवेगळया धुवून घ्याव्यात. वेगवेगळया सुती कपड्यावर सावलीत वाळत घालाव्यात.
२) तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत वाळवून घ्यावेत.
३) सर्व डाळी ब्राऊनिश रंग येईस्तोवर वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. तांदूळ आणि साबुदाणे वेगवेगळे भाजून घ्यावेत.जिरे धणे भाजून घ्यावेत.
४) सर्व डाळी, तांदूळ, साबुदाणे व इतर जिन्नस एकत्र करून थंड होवू द्यावे. थंड झाले कि बारीक दळून आणावे.

टीपा:
१) चकली भाजणीसाठी बिनसालाची उडीद आणि मुगडाळ वापरावी. सालासकट वापरल्यास चकल्या रंगाने काळ्या होतात आणि भाजणीचा स्वादसुद्धा चांगला लागत नाही.
२) सर्व डाळींवरील पावडर काढण्यासाठी ती न धुता ओल्या पंच्याला वेगवेगळ्या पुसून घ्याव्यात. यामुळे डाळी वाळवण्याचा वेळ वाचतो. तसेच डाळी भाजताना वेळ कमी लागतो.

साहित्य:
१ कप चकलीची भाजणी
१ कप पाणी
१ टिस्पून हिंग
२ टिस्पून पांढरे तिळ
१/२ चमचा ओवा
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून तेल
चवीपुरते मिठ

कृती:
१) १ कप पाणी पातेल्यात उकळत ठेवावे. त्यात हिंग, लाल तिखट, तेल, ओवा, पांढरे तिळ आणि मीठ घालून ढवळावे.
२) पाणी उकळले कि गॅस बंद करावा, चकलीची भाजणी घालावी आणि ढवळावे. ७-८ मिनीटे झाकून ठेवावे.
३) कोमट पाण्याचा हात लावून पिठ मळावे.
४) चकलीच्या सो‍र्‍याला आतून तेलाचा हात लावावा म्हणजे पिठ चिकटणार नाही. सोर्‍यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा भरून चकल्या पाडाव्यात. मध्यम आचेवर चकल्या तळून घ्याव्यात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सूत्रसंचालन

  आभार प्रदर्शनाचे स्वरूप   "ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी शिक्षण प्रसारिया ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ज्ञानाची गंगोत्री ब...