माझ्या आवडत्या लेखिका
माझ्या आवडत्या लेखिका आहेत सुधा मूर्ती माझ्या एका बाबांनी मला वाढदिवसाला 'वाईज आणि आदरवाईज' माझ्या हे पुस्तक भेट दिले वा आणि त्यानंतर अक्षरश: त्यांच्या लेखनाने मला वेड लावले. लेखिका इन्फोसिस फाऊडेशनच्या अध्यक्षा आहेत, प्रसिध्द बिझनेसमन नारायण मूर्ती यांच्या त्या पत्नी आहेत त्यांचा साधेपणा हेच त्यांचे फार मोठे सौंदर्य आहे. श्रीमंतीचा गर्व नाही, ज्ञानाचा गर्व नाही, अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. लेखिकेने स्वतः इजिनिअरींगचे शिक्षण घेतलेले आहे. त्या वेळी त्यांच्या संपूर्ण वर्गात त्या एकट्याच मुलगी होत्या अर्थातच कंपन्या फक्त पुरुष इंजिनिअर्सनाच नोकरी द्यायच्या. तेव्हा सुधा मूर्ती यांनी स्वत: टाटांना पत्र लिहून या घटनेबाबत विचारणा केली विशेष म्हणजे, इ टाटांनी तेपत्र वाचले व त्यांना ती नोकरी देऊ केली. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेचे व बेधडकपणाचे दर्शन या प्रसंगातून होते.
त्याची आजीच्या पोतडीतील गोष्टी, थैलीभर गोष्टी ही प्रसिद्ध आहेत. आयुष्याचे धडे गिरवताना, ही पुस्तके माझ्या आवडीची आहेत. ' महाश्वेता' ही त्यांची कादंबरी सुप्रसिध्द आहे. 'डॉलर बहू' 'तीन हजार टाके' 'द डे व्हेन आय स्टॉप्ड ड्रिकिंग मिल्क' अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. इंग्रजी, मराठी, कन्नड़ व पुस्तके, इतर अनेक उपलब्ध आहेत यावरून त्यांचा वाचकवर्ग किती मोठा असेल हे समजते.
दैनंदिन जीवनातल्या घटना, स्वभाव, त्यातून भेटलेली माणसे या सार्यातून लेखिका खूप वेगळ्या जगात घेऊन जाते . त्यांनी खूप लोकांना मदत केली. त्यांच्या लेखनामुळे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या त्या माझ्यासाठी आदर्श आहेत, आपण सजगपणे वावरत असू तर आपल्याला सुद्धा नक्कीच त्यांच्यासारखे अनुभव येतील, माणसे भेटतील यात शंका नाही त्यांच्या असमान्य व्यक्तिमत्त्व मला प्रचंड आवडते.
निबंध
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)
सूत्रसंचालन
आभार प्रदर्शनाचे स्वरूप "ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी शिक्षण प्रसारिया ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ज्ञानाची गंगोत्री ब...
-
नदीची लोकांना विनंती मित्रांनो आता तरी सुधरा एक आईच्या कळकळीची विनंती कृपा करून स्वीकरा तुमचा एवढा भार ...
-
आभार प्रदर्शनाचे स्वरूप "ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार" यासाठी शिक्षण प्रसारिया ध्येयाने प्रेरित होऊन आपल्या ज्ञानाची गंगोत्री ब...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा